सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये आज श्रावणी पौर्णिमेच्या मुहूर्तावर विद्यालयाच्या परंपरे नुसार रामदंडी अस्तम सिंग याच्या शुभ हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तदनंतर रक्षाबंधन व संस्कृत दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथि म्हणून विद्यालयाचे समादेशक कर्नल संदीप पुरी (निवृत्त )तथा विद्यालयाचे प्राचार्य मेजर विक्रांत कावळे तसेच शैक्षणिक संचालक श्री प्रदीपकुमार पांडे, हे लाभले. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
तदनंतर संगीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर रामदंडी अनुज पांडे इयत्ता ७ वी अ च्या विद्यार्थ्याने संस्कृत भाषेचे महत्व आपल्या शब्दात मांडले.या नंतर संस्कृत शिक्षक श्री. पंकज खैरणार यांनी संस्कृत भाषेतून संस्कृत भाषेचे आजच्या काळातील महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयाचे शैक्षणिक संचालक श्री. प्रदीपकुमार पांडे सर यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्व सांगत सर्व विद्यार्थ्यांनी मातृभाषे सोबतच संस्कृत भाषेवर प्रभुत्व निर्माण करावे असे प्रतिपादन केले.व सर्वांना रक्षाबंधानाच्या शुभेच्छा दिल्या.
तदनंतर रक्षा बंधनाचा कार्यक्रम पार पडला यात सर्व शिक्षकांनी आपल्या प्रिय रामदंडीना रक्षा बंधन करत सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष श्री. आनंद देशपांडे यांनी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यालयाचे समादेशक कर्नल संदीप पुरी(नि.), प्राचार्य मेजर विक्रांत कावळे, शैक्षणिक संचालक प्रदीप कुमार पांडे, पर्यवेक्षक श्री.विशाल जोशी,कॅप्टन जितेंद्र कुमार मिश्रा (सेना मेडल), विभाग प्रमुख श्रीमती.सुनिता हाडपे, श्रीमती. स्वाती शिंदे, सर्व शिक्षकवृंद, सर्व सैनिकी प्रशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. वैभव सर,श्री.ए एस परदेशी,श्री.डोखे सर श्रीमती. धनश्री कापडणीस तसेच इतर शिक्षकवृंद व सैनिकी प्रशिक्षक यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली.
या कार्याक्रमचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन श्रीमती. धनश्री कापडणीस यानी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.